बेळगाव जिल्हा रुग्णालयात कोविड वार्ड मध्ये सेवा बजवणाऱ्या नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. बिम्सचे संचालक विनय धास्तीकोप आणि डॉ तुक्कार या दोघांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.
तीन महिन्यांपासून बेळगाव जिल्हा इस्पितळात सेवा बजवणाऱ्या वैधकीय कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे.सदर महिला आयसोलेशन वार्ड मध्ये सेवा बजावत होती.
त्या नर्स मध्ये कोरोनाची लक्षण दिसत असल्याने तिला क्वारंटाइन करण्यात आले होते तिचे स्वॅब घेण्यात आला होता तो पोजिटिव्ह आला आहे. सायंकाळीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये याची माहिती दिली जाणार आहे.
शुक्रवारी सकाळी तिचा रिपोर्ट कोरोना पॉजीटीव्ह आला आहे.नर्सचा रिपोर्ट पॉजीटीव्ह आल्यामुळे तिला आता जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या सुमारे तीन महिन्यापासून बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. या तीन महिन्यांमधील ही पहिलीच घटना आहे, की ज्यामध्ये एका वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. या पद्धतीने एक परिचारिका कोरोना बाधित झाल्यामुळे जिल्हा आरोग्य खाते अधिकच सतर्क झाले आहे.