बेळगाव जिल्हा इस्पितळात बिम्स मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार योग्य पद्धतीनं करू असे आश्वासन देत कोरोना वार्डात सी सी टी व्ही कॅमेरे बसवून त्याचे इस्पितळ बाहेर डिस्प्ले बसवून live करणार कोरोना वार्ड पारदर्शक बनवा असा आदेश जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यात बिम्समध्ये कोरोना रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्या अनुषंगाने सोमवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली आहे त्यानुसार जिल्हा इस्पितळात सी सी टी व्हो कॅमेरे बसवणार आहेत या शिवाय डी सी एस पी आणि जिल्हा पंचायत सी ई ओ दर तीन तासाला बिम्स ला भेट देऊन पहाणी करणार असून तरी देखील कुणीही दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याचा देखील त्यांनी इशारा दिला.
लॉक डाऊन हा कोरोनावर उपाय नव्हे जनतेने मास्क परिधान सोशल डिस्टन्स पाळायला पाहिजे स्वतःची सुरक्षा स्वतः करण्याकडे लक्ष ध्याव, तूर्तास बेळगाव मध्ये लॉक डाऊन करणार नाही.लोकांच्या मागणी नुसार गोकाक मध्ये लॉक डाऊन केला आहे बेळगावात सध्या लॉक डाऊन करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
शहर आणि जिल्ह्यातील लहान मोठी क्लिनिक सुरू करणार सर्वच इस्पितळाना कोविड टेस्टिंग किट देणार असेही त्यांनी नमूद केले.यावेळी डी सी एम जी हिरेमठ, पोलीस आयुक्त त्यागराज जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्र के व्ही एस पी लक्ष्मण निंबर्गी आदी उपस्थित होते.