एकीकडे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी यापुढे लॉक डाऊन होणार नसल्याचे सूचित केले असले तरी रविवारीचा लॉक डाऊन मात्र कायम असणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला दर रविवारचा लॉक डाऊन आणि दररोज रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंतचा संचार बंदीचा अर्थात कर्फ्यूचा आदेश यापुढेही कायम राहणार आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी सायंकाळी बेंगलोर शहरातील लॉक डाऊन आणि रात्रीची संचारबंदी यापुढेही कायम राहणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानंतर लगेच राज्याचे मुख्य सचिव टी. एम. विजय भास्कर यांनी मंगळवारी रात्री एका आदेशाद्वारे बेंगलोरसह संपूर्ण राज्यामध्ये दर रविवारी राज्यव्यापी लॉक डाऊन तसेच दररोज रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत संचार बंदी पुढील आदेशापर्यंत बेमुदत जारी राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
कोरोना संदर्भातील राज्यातील चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन वरील प्रमाणे लॉक डाऊन आणि संचारबंदी यापुढेही कायम राहणार असल्याचे समजते.