बेकायदेशीररीत्या संगणक उतारे काढून दिल्याप्रकरणी सुळेभावी येथील एका ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या आधीही त्यासंबंधित पीडीओवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्या पिडिओला निलंबित करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित पीडिओ महिला बेकायदेशीररीत्या संगणक उतारे काढत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. याची दखल घेत जिल्हा पंचायतीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.
श्रीदेवी हिरेमठ असे निलंबित करण्यात आलेल्या ग्राम विकास अधिकार्याचे नाव आहे. एका संगणक उताऱ्याला वीस ते पंचवीस हजार रुपये घेत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होत्या. तालुक्यातील अनेक ग्रामविकास अधिकाऱ्यांनाही त्याचा फटका बसला होता. दरम्यान ग्रामपंचायतीची कामे होणार नाहीत या दृष्टिकोनातून जिल्हा पंचायतीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी कारवाई मागे घेतली होती. आता पुन्हा एकदा कारवाई करून हिरेमठ यांना निलंबित केले होते.
यापूर्वीही मोदगा ग्रामपंचायत हद्दीत यांनी बेकायदेशीररित्या संगणक उतारे काढण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी ही त्यांना निलंबित करण्यात आल्याची सांगण्यात आले. मात्र आता पुन्हा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बैलहोंगल येथून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केलेले हिरेमठ यांनी बऱ्याच ठिकाणी ग्राम विकास अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.