बेळगाव शहरचं नव्हे तर तालुक्यातील अनेक गावांत देखील कोरोनाने दशहत माजवली असून पश्चिम भागातील बीजगरणी या गावात एकाच दिवशी शुक्रवारी चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत
चार रुग्ण यामुळे संपूर्ण गाव आणि परिसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या अगोदर सर्वात पहिला रुग्ण देखील याच गावच्या बाजूला बेळगुंदी येथे सापडला होता.बेळगाव तालुक्यातील आजअखेर कोरोनाग्रस्ताची संख्या झपाट्याने वाढत आहे.
बिजगर्णी येथे १ जुलै बांदा (महाराष्ट्र ) तुन येथून चार जणांचे एक कुटुंब एकाच गाडीतून आले होते.त्यानंतर त्याना ७ दिवस प्राथमिक शाळेमध्ये ठेवण्यात आले होते त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केले होते. पण त्यांच्या घरातल्याना कोणताच त्रास झाला नाही. पण त्यांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवले असता त्याचा पॉझिटिव्ह आले आहेत.
ग्रामपंचायतच्या वतीने ४३ रिपोर्ट पाटवण्यात आले होते त्यापैकी एकाच कुटूंबातील तीघाचा त्यामध्ये दोन लहान मुलाचा व त्यांच्या आई आणि एक वृद्ध महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहे. संबंधित रुग्णाने होम क्वारंटाईनचे तंतोतंत पालन केले नव्हते का असा प्रश्न आता गावकरी समोर उभा आहे. आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कातील काही जणांचे घशाचे द्रव तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.
बिजगर्णी सह परिसरातील गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे सोबत कोरोना बाधीत झालेल्या घराच्या बाजूला औषध फवारणीना केली आहे.