रस्ते वाहतूक कार्यालय हे अनेक वाहन चालविणारा परवाना आणि इतर कामांसाठी परिचित आहे. मात्र लॉक डाउन झाल्यामुळे येथील कामकाज ठप्प झाले होते. ते पुन्हा सुरू झाले आहे. कोरोना महामारीमुळे अनेक जण भयभीत झाले आहेत.
मात्र आरटीओ कार्यालयाकडे आपला वाहन परवाना काढण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे आरटीओ शिवानंद मगदुम यांनी अधिकाऱ्यांना सूचना करून सुरक्षित ठेवण्याचे आव्हान केले होते. मात्र नागरिक त्यांच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे प्रकार करत आहे. त्यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आरटीओ शिवानंद मगदूम यांनी स्वतः बाहेर पडून नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांच्या अहवालाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी मार्किंग करून त्यांनी सोशल डिस्टन्स पाळण्याचा आवाहन अधिकाऱ्यांना देखील सांगितले होते. मात्र त्यांच्या वाहनाला थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिक गर्दी करून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान नागरिकांची होत असलेली गर्दी पाहून टोकन सिस्टीम सुरू करावी अन्यथा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याकडे आरटीओ शिवानंद मगदूम यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
सध्या आरटीओ कार्यालयात कच्चा वाहन परवाना वाहनांची नोंद करणे वाहन परवाना काढणे यासह इतर अनेक कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी वारंवार होत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टन्स ठेवणे ही काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून आता आरटीओ कार्यालयातील अधिकार्यांनी पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.