येत्या मंगळवारपासून आठवडाभराचा लॉक डाऊन आता फक्त बेंगलोर शहर आणि ग्रामीणमध्येच जारी होणार नाहीतर राज्यातील बेळगांवसह अन्य 12 जिल्हे देखील लॉक डाऊनच्या यादीत आहेत.
लॉक डाऊन जारी होऊ शकणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये बेळगांव, कलबुर्गी, म्हैसूर, मंगळूर, उडपी, बिदर, बेळ्ळारी, धारवाड, रायचूर, गदग आणि दावणगेरे यांचा समावेश आहे. कारण या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान 300 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
या जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन जारी करण्यासंदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सोमवारी दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
त्याचप्रमाणे सोमवारीच सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री कोरोना परिस्थिती संदर्भात अन्य जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची आणखी एक बैठक घेणार आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना महसूलमंत्री आर. अशोक यांनी सध्या राज्यातील 12 जिल्ह्यात कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे संबंधित जिल्ह्यामध्ये लॉक डाऊनचा विचार होऊ शकतो, असे सांगितले.
बेळगाव जिल्ह्यात जरी रुग्ण कमी असले तरी बेळगाव हा महाराष्ट्र आणि गोव्याच्या अश्याया दोन राज्यांच्या सीमेवरील संवेदनशील जिल्हा आहे जवळपास 150 की मी सीमा या जिल्ह्याची आहे महाराष्ट्र गोव्यातून लोकांची दररोज ये जा असते त्यामुळे बेळगाव जिल्हा देखील लॉक डाउनच्या यादीत आहे मंगळवारी पासून बेळगाव देखील कडक लॉक डाउन होऊ शकतो.
Yes lockdoun
Lockdown karana bahut jaruri hai specialy in Belgaum