बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात आढळलेल्या 279 कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक एकूण 89 रुग्ण बेळगाव शहर व तालुक्यात आढळून आले असून त्यापैकी 65 रुग्ण बेळगाव तालुक्यातील आहेत.
बेळगाव शहर आणि तालुक्याखालोखाल आज गोकाक तालुक्यात 54, अथणी 40, रायबाग 28, हुक्केरी 23, सौंदत्ती 12 खानापूर 12, चिक्कोडी 9, रामदुर्ग 7 आणि बैलहोंगल तालुक्यात 5 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तो भाग आणि रुग्णसंख्या अनुक्रमे खालील प्रमाणे आहे.
गोकाक तालुका 57 रुग्ण. शिरगुप्पी -कागवाड तालुका 19 रुग्ण. एटीएस सांबरा विमानतळ 16 रुग्ण, कलमेश्वर गल्ली खानापूर 5 रुग्ण. आयटीबीपी, यळेबैल -खानापूर 4 रुग्ण. रामतीर्थ नगर, केएसआरपी मच्छे,
लोंढा -खानापूर व जुगूळ -कागवाड तालुका प्रत्येकी 3 रुग्ण. बीम्स, आयसीएमआर लॅब, अशोकनगर, रोहन रेसिडेन्सी वडगांव, पोलीस स्टेशन हिरेबागेवाडी, सदाशिवनगर, चिन्मय रेसिडेन्सी श्रीनगर, वीरभद्रनगर, शहापूर, शिवबसवनगर, कागवाड शहर प्रत्येकी 2 रुग्ण.
बेपारी गल्ली, बेंदी धर्मनाथ, तिरंगा सौध कंग्राळी, पीजी गर्ल्स, कुवेंपूनगर, सरस्वतीनगर गणेशपुर, गणेशपुर, वैभवनगर, बोजगार गल्ली, नेहरूनगर, मौर्या गल्ली कंग्राळी खुर्द, शिवाजीनगर, उज्वलनगर, कंग्राळी आझादनगर विजयनगर रक्षक कॉलनी, डीएचओ ऑफीस, तेग्गीन गल्ली वडगाव, आरसीयु सिंडिकेट बँक,
तारानगर, पिरनवाडी, राणी चन्नम्मानगर, शिंदोळी मुतगा, सपार गल्ली वडगाव, उज्वलनगर, आनंदवाडी, शाहूनगर, बसवान गल्ली होसुर, बागवान गल्ली निपाणी, कागवाडे प्लॉट निपाणी, काकती, नंदिहळ्ळी, मुतगा, शिंदोळी माळ, विद्यानगर खानापूर, मंगावती -कागवाड तालुका प्रत्येकी 1 रुग्ण.