बेळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा आकडा सातशेच्या वर गेला असून त्याची वाटचाल 1000 कडे सुरू आहे. त्यामुळे बेळगाव शहरात आणि तालुक्यात लॉकडाऊन का करण्यात आले नाही जर लॉकडाऊन करायचे नसेल तर रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे याकडे आता प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष देऊन लॉकडाऊन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात पाच जणांचा मृत्यू झाला होता तर 95 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव जिल्ह्यातील आतापर्यंत मृत्यू होणाऱ्यांची संख्या २१ हून अधिक झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील 15 तालुके लॉकडाऊन करण्यात आले आहेत तर उर्वरित तालुक्यांमध्ये देखील लॉक डाऊन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
या निर्माण झालेल्या द्विधा मनस्थितीत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे ही लक्ष लागून राहिले आहे. अनेक लोकप्रतिनिधी लॉक डाऊन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र काही लोकप्रतिनिधी लॉकडाऊन नको अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बेळगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू होण्याचे प्रकार दिवसेंदिवस कणिक वाढत आहे. त्यामुळे आता भीती निर्माण झाली आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने लॉकडाऊन करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शुक्रवारी बेळगाव शहरातील नऊ तर तालुक्यातील 27 आणि जिल्ह्यातील 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्यातरी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बेळगाव तालुका देखील लॉक डाऊन करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. याकडे आता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत अन्यथा आणखी किती मृत्यू पाहणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.