कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेले बिम्स इस्पितळ रविवारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
ऑक्सिजन सीलेंडर बदल करतेवेळी सिलेंडर गॅस व सॅनिटायझर वर अचानक आग लागल्याने तिघे जण भाजून जखमी झाले आहेत.,रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. मात्र लागलीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार बिम्स मधील इमर्जन्सी वार्ड मध्ये सिलेंडर बदल करतेवेळी गॅस लिकेज झाले होते त्यानंतर लिकेज गॅस आणि सॅनीटायझर मिक्स होऊन अचानक आग लागली त्यामुळे या वार्डात धावपळ उडाली होती.
या घटनेत एक नर्स वार्ड बॉय आणि डॉक्टरला भाजून किरकोळ दुखापत झाली आहे.सदर घटनेवेळी सिलेंडर ब्लास्ट झाला आहे अशी अफवा पसरल्याने काही काळ अफरा तफरी व गोंधळ निर्माण झाला होता इस्पितळ परिसरात उपस्थित लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र सदर घटना आगीची आल्याने इथल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला खरे काही काळ भीतीचे वातावरण होते एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे आग त्यामुळे वातावरण देखील तणावाचे झाले होते.