बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मद्याची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला असून कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. याचबरोबर विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रकात शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते शनिवार दिनांक एक ऑगस्ट च्या मध्यरात्री पर्यंत मद्याची दुकाने बंद असणार आहेत.
सध्या कोरोना महामारीमुळे अनेकजण भयभीत झाले आहेत. त्यामुळेच बकरी ईद हा सण देखील मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने करावा नमाज पठण करण्यासाठी नियमांचे पालन करावे याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवून नमाज पठण करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून मद्याची दुकाने बंद असणार आहेत. बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. याचबरोबर विविध ठिकाणी पीस कमिटीच्या मीटिंग घेऊन संबंधितांना सूचना करण्यात आल्या आहेत.
खडेबाजार येथील एसीपी के चंद्रप्पा यांनीदेखील बैठक घेऊन संबंधितांना सूचना केल्या आहेत व ईद शांततेत पार पडावी यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.
Good