Sunday, December 1, 2024

/

‘एपीएमसी भाजी मार्केट येथील व्यापाऱ्याला कोरोनाची बाधा’

 belgaum

एपीएमसीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्स फज्जा उडत आहे. त्यामुळे येथे कोरोना सारखा आजार मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नुकतीच एका भाजी मार्केट व्यापार्‍याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे आता भाजी मार्केटमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कपिलेश्वर मंदिर परिसर भागांत राहाणारा एक सामाजिक कार्यकर्ता देखील कोरोना बाधित झाला आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव आल्यानंतर त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत मात्र त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी किती जणांना याची लागण झाली आहे हे समजणे कठीण झाले आहे. संपर्कात आलेले अनेक जण होम क्वांरंटाइन झाले आहेत.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बेळगाव जिल्ह्यात नुकतीच 400 चा आकडा पार झाला आहे. त्यामुळे भितीदायक वातावरण असून भाजी मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने आता जनमानसातही कोरोना पसरत असल्याचे दिसून येत आहे.

Apmc veg market file pic
Apmc veg market file pic

एपीएमसी येथील भाजी मार्केटच्या व्यापाराला कोरोनाची लागण झाल्याने आता एपीएमसीमध्ये देखील निर्बंध आणणे गरजेचे आहे. एपीएमसीमध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

नुकतीच जिल्हाधिकारी यांनी भाजी मार्केट पहाटे पाच ते दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या परिस्थितीत देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. भाजी मार्केट येथील व्यापार्‍याला कोरोनाची लागण झाल्याने आता खळबळ माजली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.