Thursday, December 26, 2024

/

पोलीस निरीक्षकांनी केला पंच कमिटीचा सत्कार

 belgaum

कोरोनामुळे सर्वत्र दशहत पसरली असताना प्रशासन जनतेला सोशल डिस्टन्स व मास्क परिधान करणे सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन करत असताना देवस्थान कमिटीने स्वतः होऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला त्या पंच कमिटीचा सत्कार पोलिसांनी केला आहे.

बेलदार छावणी, सदाशिवनगर येथील मरगाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक व देवस्थान कमिटीने स्वतः हा निर्णय घेऊन आपला निर्णय पोलीस अधिकाऱयांना कळविला आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Javed
Cpi javed felicited panch commitee

मंगळवारी 14 जुलै रोजी मरगाई देवीची यात्रा होणार होती. कोरोना महामारीचा फैलाव वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेऊन यात्रा कमिटीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वतः पोलीस स्थानकात येऊन कळविला.

रविवारी सायंकाळी तेथील कार्यकर्ते एपीएमसी पोलीस स्थानकात जमले होते. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करणाऱया कार्यकर्त्यांचे कौतुक केले. कोरोना थोपविण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी केल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.