बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बुधवारी कोरोनामुळे तीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.कोल्हापूर सर्कल जवळील एका 55 वर्षाच्या हॉटेल मालकाचा मृत्यू झाला आहे.अनगोळच्या 77 वर्षाच्या वृद्धाचा आणि अथणीच्या 58 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 18 झाली आहे.
मंगळवारी 64 कोरोना रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली असून त्यापैकी 28 कोरोनाबाधित बेळगाव शहरातील आहेत.बुधवारी 19 कोरोनामुक्त रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बेळगाव शहरात देखील कोरोनाबाधितांचा संख्येत।दररोज वाढ होत असून नागरिक बेपर्वाईने वागत आहेत.मास्कने नाक आणि तोंड झाकण्या ऐवजी मास्क गळ्यात अडकवून फिरणाऱ्यांची संख्या बरीच आहे.या बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा संसर्ग पसरत आहे.प्रत्येक नागरिकाने मास्क व्यवस्थित घालूनच सार्वजनिक ठिकाणी फिरणे आवश्यक आहे अन्यथा कोरोनाचा फैलाव वाढणार आहे.