Friday, December 20, 2024

/

बेळगावच्या अनंत जांगळे यांची या नाट्य संस्थांच्या संघावर निवड

 belgaum

मुंबई विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील नाट्य वितरक व व्यवस्थापकांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरक-व्यवस्थापक संघ या संस्थेची नव्याने स्थापना केली असून या संघटनेची पहिली सभा १९ जुलै २०२० रोजी झूम अँपद्वारे पार पडली. या सभेत २४ सभासदांनी आपली उपस्थिती नोंदविली. यामध्ये बेळगावच्या अनंत जांगळे यांची निमंत्रित सदस्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र बाहेरील केवळ बेळगावातून एकट्याच जांगळे यांची निवड झाली आहे . जांगळे यांनी बेळगावातील नाट्य परंपरेला योगदान दिले आहे .

गिरीश महाजन यांनी स्वागत करून या सभेची सुरुवात केली. त्यानंतर आनंद कुलकर्णी यांनी संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट केली. सर्वांच्या ओळखीनंतर नियोजित पदाधिकारी, कार्यकारी समिती आणि निमंत्रित सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी नाशिकच्या जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्षपदी कोल्हापूरच्या गिरीश महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याचप्रमाणे उपाध्यक्षपदी मोहन कुलकर्णी, समीर पंडित, प्रमुख कार्यवाहीपदी आनंद कुलकर्णी, सहकार्यवाहपदी प्रवीण बर्वे, संदीप सोनार, खजिनदारपदी समीर हंपी यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारी समिती सदस्यामध्ये धनंजय गाडगीळ (सांगली), विजय कुबडे (राजापूर), राकेश नेमळेकर (कुडाळ), गुरु वठारे (सोलापूर), राजेंद्र जाधव (नाशिक), आबा ढोले (परभणी) आणि रघुवीर देशमुख (अमरावती) यांचा समावेश आहे. तर निमंत्रित सदस्यांमध्ये दादा साळुंखे (सोलापूर), योगेश कुट्रे (चिपळूण), राजू परदेशी (औरंगाबाद), किशोर सावंत (रत्नागिरी), लक्ष्मण उपारे (सोलापूर), अनंत जांगळे (बेळगाव) यांचा समावेश आहे.

पदाधिकारी निवडीनंतर नूतन अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी उपस्थित सर्व सभासदांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. या सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले.

यसभेला जयप्रकाश जातेगावकर, राजेंद्र जाधव, संदीप सोनार, आबा ढोले, प्रदीप मुळे, विजयदादा साळुंखे, गुरु वठारे, शिवाजी उपारे, रघुवीर देशमुख, हेमंत गुहे, समीर पंडित, शशांक गडकरी, मोहन कुलकर्णी, समीर हंपी, मंदार बापट, शिरीष कुलकर्णी, प्रवीण बर्वे, आनंद कुलकर्णी, आनंद कदम, योगेश कुष्टे, राहुल खिल्लारे, धनंजय गाडगीळ, गिरीश महाजन आदींनी झूम अँपद्वारे आपली उपस्थिती नोंदविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.