Friday, November 15, 2024

/

बेळगाव लॉकडाऊन करा बेळगावकरांचा टाहो

 belgaum

कोरोनाचा प्रभाव बेळगावात विस्फोटक पद्धतीनं होत आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात 60 हुन अधिक पॉजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. जागोजागी एरिया सील करण्यात आल्या आहेत. जनतेत एक प्रकारची घबराट निर्माण झाली आहे.

प्रत्येकाला एकमेकांविषयी संशय वाटत आहे. आज कोरोना कधी कुणाला गाठेल याचा नेम राहिला नाही. माणसांची मने एकमेकापासून दुरावत चालली आहेत. अश्या परिस्थितीत 15 दिवसांचा लॉक डाऊन करून कोरोनाची कम्युनिटी स्प्रेडची साखळी तोडण्याची गरज निर्माण झाली आहे.

केवळ सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे किंवा सोशल डिस्टन्स पाळणे यामुळे हा कोरोना आटोक्यात येईल अशी शक्यता कमी आहे. कारण सगळीकडे याचे पालन होताना दिसत नाही.बेळगावात पावसाळी वातावरण चालू आहे. पावसाळ्यात होणारे विविध रोग, त्याच बरोबर डेंग्यूचाही फैलाव होण्यास सुरू झाला आहे. या रोगाबरोबरच जर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर जीवितहानी मोठी होऊ शकते.अश्या गुंतागुंतीच्या व्याधी निर्माण झाल्या तर त्याच्यासाठी उपचार करण्याचा खर्च अफाट येतो, सामान्य बेळगावकर जनतेला तो खर्च परवडणारा नाही. अश्या अवस्थेत सामान्य जनतेला मरणाच्या खाईत लोटल्या सारखे होईल, या स्थितीचा जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी साकल्याने विचार करून त्वरित लॉक डाऊन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Bhrashatachar nirmulan pariwar
Bhrashatachar nirmulan pariwar

बेळगाव live या वेबन्यूज चॅनेलने सामान्य जनतेची व्यथा वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली, तसेच अनेक अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली आहे.बेळगाव liveची ही भूमिका अनेक लोकांनी उचलून धरली असून., आता तर संस्था आणि संघटनाच जिल्हाधिकारी यांच्याकडे साकडं घालत आहेत. पालकमंत्री रमेश जारकीहोळी देखील बेळगाव शहर व तालुक्यात लॉक डाऊन करा या भूमिकेच्या बाजूने आहेत.

भ्रष्टाचार निर्मुलन परिवार या संघटनेचे अध्यक्ष सुजीत मूळगुंद, वकील नितीन बोलबंदी आणि वकील श्वेता कुलकर्णी यांनी निवेदन देत डी सी यांच्याकडे बेळगाव लॉक डाऊन करा अशी मागणी केली आहे.

या निमित्ताने बेळगाव live सामान्य माणसाचा आवाज आहे हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.