Friday, November 15, 2024

/

अबब् राज्यात आढळते 1,272 रुग्ण : जिल्ह्याच्या संख्येत 8 जणांची भर

 belgaum

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील 8 रुग्णांसह राज्यात नव्याने तब्बल 1,272 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 1 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 16,514 इतकी झाली असून कोरोनामुळे राज्यात आणखी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 336 झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात काल सायंकाळपासून नव्याने 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यापैकी पी -15348 या क्रमांकाचा 50 वर्षीय पुरुषाच्या प्रवास इतिहासाचा शोध सुरू आहे. पी -15349 या क्रमांकाची 32 वर्षीय महिला नागालँड होऊन जिल्ह्यात आली आहे. पी -15350 क्रमांकाची 12 वर्षीय बालिका आणि पी -15351 क्रमांकाचा 50 वर्षीय पुरुष हे दोघेजण महाराष्ट्र रिटर्न आहेत.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 30 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवार दि. 1 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 1,272 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16,514 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 8,194 असून यापैकी 292 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात बुधवारी 145 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 8,063 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 7 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 253 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून त्यापैकी 28 जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 735 रुग्ण – एकूण रुग्ण 5290), बेळ्ळारी (85-919), मंगळूर ( 84-825) आणि बेळगाव (8-336).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.