एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक अधिकारी झटत आहेत.कोरोनाच्या जिल्हा पंचायत सी इ ओ डॉ के व्ही राजेंद्र यांनी कामाचा झपाटा लावला आहे.
बेळगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांनीही कामाला सुरुवात केली आहे. सध्या बेळगाव तालुक्यातील वेगवेगळ्या कामांना गती देण्यात आली. नुकतीच जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील के के कोप येथे भेट देऊन विकास कामांची पाहणी केली आहे.
या वेळी काही सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन अनेक जण कामाला लागले आहेत. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांनी भेट देऊन विकास कामांची पाहणी केली आहे. उद्योग खात्री योजनेतील कामगारांशी संवाद साधून त्यांनी कामांचा दर्जा तपासून अनेकांना कामांची माहिती दिली. याचबरोबर देशाच्या आर्थिक घडी बसवण्यासाठी उद्योग खात्रीतून विकास कामांना गती द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.
जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन त्यांनी येथील पाणी पुरवठा व्यवस्थित होतो की नाही याची पाहणी केली. याच बरोबर जे उद्योग कात्रीतून व इतर योजनेतून रस्ते करण्यात आले आहेत त्यांची पाहणी देखील त्यांनी केली आहे. या सर्व कामांची पाहणी करून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गावचा विकास साधण्यासाठी प्रत्येकाने ठरवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्याबरोबर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी व इतर अधिकारी उपस्थित होते.