उचगावचे काँग्रेसचे निष्ठावन्त कार्यकर्ते ग्रामीण काँग्रेस मधील मराठी चेहरा युवराज कदम यांची बेळगाव एपीएमसी अध्यक्षपदी बिन विरोध निवड झाली आहे तर हुदलीच्या महादेवी खनगौडर यांची निवड झाली आहे.
सोमवारी सकाळी उमेदवारी झालेल्या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी युवराज कदम यांची अध्यक्ष तर महादेवी खानगौडर यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा तहसीलदार कुलकर्णी यांनी घोषणा केली.
सोमवारी सकाळी एपीएमसी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुक प्रक्रियेस सुरुवात झाली
अध्यक्ष पदासाठी भाजप कडून रेणुका पाटील
काँग्रेस कडून लगमाना नायक युवराज कदम ,संजीव मदार,एम ई एस कडून महेश जुवेकर यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेस महादेवी खानगौडर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता
अर्ज माघारी साठी दुपारी 12 पर्यन्त नामांकन केलेल्या अर्ज माघारी घेतले त्यामुळे युवराज कदम व महादेवी खानगौडर यांची बिन विरोध निवड झाली आहे. यावर्षीच्या कोरोना प्रादुर्भावा मुळे निवडणूक बिन विरोध करण्याचे ठरवले होते.
सतीश जारकीहोळी यांनी केली निवड
मागील एपीएमसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत युवराज कदम यांचा पराभव झाला होता याअगोदर कदम यांनी बेळगाव बुडा अध्यक्षपडदेखील भूषवले होते.सतीश जारकीहोळी यांच्याकडे सर्व 11 सदस्यांनी उमेदवार निवडीचे अधिकार दिले होते त्यानुसार जारकीहोळी यांनी निवड केली.
भाजप समिती आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या सहकार्यातुन मला पद दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या साठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया युवराज कदम यांनी दिली.