बेळगाव ए पी एम सी मध्ये भाजपला केवळ एकच जागा मिळाली होती त्यामुळे तिथं काहीही करणं साध्य नव्हतं म्हणून अध्यक्ष युवराज कदम यांना मीच अध्यक्ष बनवलं आहेअसं वक्तव्य जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी काढलं आहे.
बेळगावात सोमवारी सकाळी मनपा सभागृहात स्मार्ट सिटी विकास कामांचा आढावा बैठकी अगोदर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले आहे.
मागील आठवड्यात युवराज कदम यांना सर्व पक्षीयांनी अध्यक्ष बनवलं होत कदम हे मूळचे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते आहेत त्यातच त्यांना समिती भाजपच्या सदस्यांनी बिन विरोध अध्यक्ष बनवलं आहे त्यामुळे कदम हे आक्काचे आहेत की अण्णांचे आहेत याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
ए पी एम सी अध्यक्षपद देतेवेळी युवराज कुणाचे याबाबत चर्चा रंगली नव्हती मात्र पालक मंत्र्यांच्या वक्तव्या नंतर युवराज कदम नेमकं कुणाचे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. कदम याबाबत काय बोलणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे कारण त्यांना सर्व पाक्षियांनी अध्यक्ष बनवलं आहे.
एच विश्वनाथ आणि उमेश कत्ती यांना मंत्री पद देणार की नाही याबाबत बोलताना त्यांनी हा प्रश्न हाय कमांडचा असून याबाबत तेच निर्णय घेतील मी एक सामान्य कार्यकर्ता आहे असे ते म्हणाले.
विरोधी पक्ष आम्ही जिवंत आहे हे दाखवण्यासाठी आंदोलन करत असतात लवकरच केंद्रातील भाजप सरकार गरिबांसाठी योजना जाहीर करणार आहे असेही ते म्हणाले.बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जनतेच्या कल्याणाची कामे करतो असेही त्यांनी नमूद केलं.