बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी हे प्रदीर्घ सेवा बजावून 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राज्यात सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या बेळगावच्या जिल्हाधिकारी पदासाठी अनेक आय ए एस अधिकारी उत्सुक असून अनेकांनी लॉबिंग देखील करायला सुरुवात केली आहे.
सध्या कोण होणार बेळगावचे डी सी बोंमनहळळी यांचे उत्तराधिकारी कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे.सध्या गदगचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ,आर रामचंद्रन ,दीपा चोळन,राजेंद्र चोळन यांच्या बरोबरच बेळगाव जिप सी ई ओ डॉ के.व्ही.राजेंद्र यांची नावे चर्चेत आहे.जिल्ह्यातील राजकारणी देखील वेगवेगळी नावे सांगत आहेत.
मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे जिल्ह्यातील मंत्र्यांची मते जाणून घेऊन निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.ऐनवेळी सध्या चर्चेत असलेली नावे सोडून अचानक वेगळ्या व्यक्तीची नेमणूक देखील बेळगाव जिल्हाधिकारी पदावर होऊ शकते.