वडगावचे आराध्य दैवत आणि जागृत नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री मंगाई देवीची यात्रा यावर्षी साधे पणाने पण परंपरेचे पालन करून साजरी केली जाणार आहे.
गुरुवारी मंगाई देवीच्या पंच कमिटीची बैठक झाली या बैठकीत यात्रे बद्दल सगळ्या पंचांची मते जाणून घेण्यात आली त्यानंतर सगळ्यांच्या मुद्द्यावर साधक बाधक चर्चा करून यावर्षी परंपरे प्रमाणे शुक्रवारी (दि.12 जून) रोजी गाऱ्हाणे घालण्यात येणार आहेत.
परंपरे नुसार एक महिना वार पाळण्यात येणार आहे वाराच्या दिवशी कुमारिका देवांना पाणी घालणार आहेत यावेळी कुणालाही तिथे उपस्थित राहून गर्दी करता येणार नाही.एक महिना परंपरे प्रमाणे वार पाळले जाणार आहेत वार पाळनुक संपल्या नंतर त्यावेळीची परिस्थिती ध्यानात घेऊन त्याचा अभ्यास करून यात्रा कशी साजरी करायची याचा निर्णय पंच मंडळी घेणार आहेत.
सध्या कोरोनाचे सावट असल्यामूळे मंदिरातील प्रवेश करण्यासाठी भक्तांना तसेच मंदिराच्या व्यवस्थापनाला अनेक नियम अटींचे पालन करावे लागत आहे.या नियमानुसार भक्तांना मंदिरात कापूर उदबत्ती नारळ फुलं फळ नेण्यास मनाई आहे. याबरोबर मंदिरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान करणे बंधनकारक आहे त्यामुळे एक महिन्या नंतर या नियम आणि अटीमध्ये सरकार काय बदल करणार यावरचं यात्रा कशा पद्धतीने साजरी करायचा हा निर्णय घेतला जाणार आहे.
यावेळी शांताराम पाटील,मानसिंग चव्हाण पाटील, अनिल चव्हाण पाटील,अनंत चव्हाण पाटील,शशीकांत चव्हाण पाटील,युवराज चव्हाण पाटील राजेश चव्हाण पाटील आदी उपस्थित होते