देशभरातील लाॅक डाऊन शिथील करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने अनलॉक -1 नंतर आता अनलॉक -2 च्या टप्प्या अंतर्गत नवीन नियमावली सोमवारी जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार 31 जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉक डाऊन लागू असणार आहे.
केंद्राच्या नव्या नियमावलीनुसार देशभरातील शाळा, महाविद्यालय व कोचिंग इन्स्टिट्यूट 31 जुलैपर्यंत बंदच राहणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयांप्रमाणे नव्या नियमावलीनुसार मेट्रो रेल्वे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, एंटरटेनमेंट पार्क, बार, ऑडिटोरियम, सभागृह इत्यादी 31 जुलै पर्यंत बंद राहणार आहेत. तसेच गर्दी होण्याची शक्यता असलेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कायम असणार आहे.
कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी राहणार आहे केवळ गृहमंत्रालयाने अनुमती दिलेल्या लोकांनाच विदेश प्रवास करता येणार आहे. देशांतर्गत विमानसेवा आणि रेल्वेप्रवास मर्यादित कक्षेत यापूर्वीच सुरू करण्यात आला असून तो यापुढेही सुरू राहणार आहे. कंटेनमेंट घेऊन बाहेर केंद्र आणि राज्याच्या प्रशिक्षण संस्थांना 15 जुलैपासून कामकाज सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची चर्चा करून ही नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. दरम्यान, अनलॉक -2 च्या या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्त आणि संबंधित खाते प्रमुखांना देण्यात आला आहे.