Saturday, December 21, 2024

/

अखेर उमेश कत्तीना मिळणार मंत्रिपद

 belgaum

आमदार उमेश कत्ती यांनी बुधवारी सकाळी बंगलोर येथे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांची त्यांच्या कावेरी निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल असे सांगितले.पण रमेश कत्ती याना राज्यसभेचे तिकीट देणे आपल्या हातात नसून त्या बाबत हाय कमांड निर्णय घेईल असे मुख्यमंत्र्यांनी कत्ती यांना सांगितले.

यावेळी कत्ती यांनी त्यांच्या घरी झालेल्या डिनर मिटिंग बाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.आपण सरकारला धक्का पोचवणार नाही असेही त्यांनी सांगितले.डिनर मिटींगला उपस्थित असलेल्या भाजपच्या आमदारांची भूमिका कत्ती यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितली.

कत्ती यांच्या बंगलोर येथे झालेल्या आमदारांच्या डिनर बैठकीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.अखेर मुख्यमंत्र्यांनी कत्ती यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिल्यामुळे सध्या तरी राजकीय आघाडीवर काही हालचाली होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.