शहरातील बिल्डर,व्यापारी आणि धनिकाना फोनवरून धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या दोन गुंडांना खडेबाजार पोलिसांनी गजाआड केले आहे.कॅम्प पोलीस स्टेशन आणि शहरातील अन्य पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजार पोलिसांनी या खंडणी उकळणाऱ्या दोन गुंडांना अटक केली आहे.विशालसिंग विजयसिंग चव्हाण(21) आणि प्रथमेश नारायण गणीकोप असे खडेबाजार पोलिसांनी अटक केलेल्या गुंडाची नावे आहेत.
हे दोघेही शास्त्रीनगरचे रहिवासी आहेत.त्यांच्याकडून पोलिसांनी कार, बाईक,हत्यारे आणि मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.हे दोघेजण बिल्डर,व्यापारी आणि धनिकाना फोन करून खंडणी मागत होते.खंडणी दिला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकीही देत होते.खडेबाजार पोलिसात या प्रकरणाची नोंद झाली आहे.