वॅक्सिंन डेपो येथे सोमवारी दुपारी तलवारीने हल्ला केल्यानंतर एक तरुण जखमी झाला होता. या प्रकरणातील दोघा जणांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. महेश बबन गवळी वय 32, श्याम बबन गवळी वय 30 दोघेही राहणार मंगळवार पेठ टिळकवाडी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांनी सोमवारी दुपारी व्हॅक्सीन डेपोजवल श्रीकांत बबन गवळी वय 35 राहणार गवळी गल्ली या युवकावर तलवारीने हल्ला केला होता. भाऊबंदकीचा वादातून गवळी गल्ली येथील श्रीकांतवर त्यांनी तलवारीने हल्ला केला होता. त्यानंतर त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. मंगळवारी पोलिसांनी महेश व श्यामला अटक केली आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोघा भावांना अटक केली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. त्यांच्यावर याप्रकरणी भादवि 307 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Trending Now
Less than 1 min.
Previous article
Next article