जंगल वाचवणे ही काळाची गरज असली तरी स्मार्ट सिटी काम करताना सरकार किंवा प्रशासनाला या कामात अडथळा आणणार्या झाडांना हटवणे अपरिहार्य ठरते अर्थात पर्यावरण प्रेमींनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून वृक्षांचे पुनरप्रत्यारोपण करण्याचा प्रयोग सुरू झाला असून तो यशस्वीही ठरत आहे.
बेळगावमध्येही पर्यावरण प्रेमी आणि ट्री मॅन म्हणून ओळखले जाणारे किरण निप्पाणीकर यांच्या प्रयत्नातून वृक्षांच्या पुनरप्रत्यारोपणाचा प्रयोग बेळगावातही होणार आहे. बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे एमडी शशिधर कुरेर यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग होत आहे.
स्मार्ट सिटीचे एमडी शशिधर कुरेर यांच्या संकल्पनेतून आणि वन अधिकारी डीसीएफ अमरनाथ यांच्या सहकार्याने शहरात 28 झाडांचे पुनर्ररोपण करण्याच्या योजनेला प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी तांत्रीक सहाय्य पर्यावरणप्रेमी आणि ट्री मॅन म्हणून ओळखले जाणारे किरण निप्पाणीकर यांचे तांत्रीक सहकार्य लाभले आहे.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत असा प्रयोग प्रथमच होत असून या प्रयोगाद्वारे शहरातील श्रीनगर रोडवरील पूर्ण वाढ झालेली झाडे काढून दुसरीकडे लावण्यात येणार आहेत. या पद्धतीने एकूण 28 झाडे काढून ती दुसरीकडे लावण्यात येणार आहेत. केएमएफ डेअरीने या झाडांच्या देखभालीची जबाबदारी घेण्यास होकार दिला आहे. श्रीनगर येथे रस्त्याच्या कामात ही झाडे अडथळा ठरत होती म्हणून ही झाडे काढून दुसरीकडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
किरण निप्पाणीकर यांनी आजवर शंभरहून अधिक झाडे काढून त्यांचे पुनर्ररोपण केले असून त्यापैकी नव्वद टक्के झाडे जगली आहेत. बेळगावमध्ये त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला तर बेळगावची हिरवाई कायम टिकून राहणार आहे. गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणार्या या शहराची ओळख पुन्हा जपली जाईलच, शिवाय एक निसर्गसंपन्न शहर अशीही बेळगावची नव्याने ओळख निर्माण होईल.