बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लमा ,जोगुळभावी सत्तेमादेवी आणि चिंचली मायक्का देवस्थानात 31 जुलै पर्यंत भक्तांना दर्शनासाठी नो एंट्रीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातून या तिन्ही देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात.अनेक घराण्याच्या या कुलदेवता देखील आहेत.त्यामुळे दररोज ठिकठिकाणाहून भक्त देवीचे दर्शन आणि अभिषेक आदी विधी करण्यासाठी येत असतात.त्यामुळे भक्तांनी मंदिरे फुललेली असतात.
सध्या कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.बाहेरच्या राज्यातून भक्त आले तर आणखी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 31 जुलै पर्यंत भक्तांना दर्शन घेता येणार नाही.जिल्हाधिकारी डॉ .एस.बी.बोमनहळ्ळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र आणि अन्य राज्यातून देवी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दररोज दर्शनाला भाविक येत असतात.त्यामुळे 31 जुलै पर्यंत बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लमा,जुगळभावी सत्तेमादेवी आणि चिंचली मायक्का मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जाणार नाही.