आपला खाजगी स्वीय सहाय्यक अर्थात पीए कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुंबई अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारी याच्या प्रत्यार्पणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमरकुमार पांडे यांनी यांनी स्वतःला होम काॅरन्टाईन केले आहे.
बेंगलोर येथे एका वृत्तसंस्थेशी बोलताना सध्या राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक असणाऱ्या अमरकुमार पांडे यांनी आपला पर्सनल असिस्टंट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे आपण होम काॅरन्टाईन झाल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई अंडरवर्ल्डचा गँगस्टर रवी पुजारी याच्या सेनेगल येथून बेंगलोरमधील प्रत्यार्पणात पांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, आतापर्यंत कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलातील 56 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.