Thursday, December 19, 2024

/

“त्या” महिलेचे सर्व प्रायमरी कॉन्टॅक्ट्स निगेटिव्ह : आरोग्य खात्याचा सुटकेचा निश्वास

 belgaum

सदाशिवनगर येथील पी -974 क्रमांकाच्या कोरोना बाधित रुग्णाच्या सर्व प्रायमरी कॉन्टॅक्ट्सचा (प्राथमिक संपर्कांचा) कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्राकडून सांगण्यात आल्यामुळे आरोग्य खात्यासह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.

महाराष्ट्रातून आलेली सदाशिवनगर येथील पी -974 क्रमांकाची गर्भवती महिला गेल्या 14 मे रोजी कोरोनाग्रस्त आढळून आली होती. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या 10 प्रायमरी कॉन्टॅक्ट्सना काॅरन्टाईन करण्यात आले होते. या सर्वांचे 12 दिवसानंतर स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत धाडण्यात आले होते. या नमुन्यांचा तपासणी अहवाल नुकताच हाती आला असून संबंधित सर्व 10 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. सध्या शहरात सदाशिव नगर येथेच फक्त कंटेनमेंट झोन लागू आहे. याआधी आझाद गल्ली, कॅम्प, येळ्ळूर व पिरवाडी येथील कंटेनमेंट घेऊन हटविण्यात आले आहेत.

सदाशिनगर येथील कोरोना बाधित गर्भवती महिला बरेच दिवस घरात राहिली असल्यामुळे बरेच जण संसर्गित झाले असावेत अशी भीती आरोग्य खात्याला वाटत होती. सदर महिलेला बेकायदा राज्यात (बेळगावात) आणल्याबद्दल तिचा पती व कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंतु आता तिच्या संपर्कात आलेल्या सर्व प्रायमरी कॉन्टॅक्ट चा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासन व आरोग्य खात्यासह शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. येत्या कांही दिवसात संबंधित महिलेचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यास तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो आणि तसे झाले तर सदाशिवनगर येथील कंटेनमेंट झोन देखील हटविला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.