दिनांक २१-६-२०२० रविवार रोजी
राहुग्रस्त चूडामणिसंज्ञक सूर्यग्रहण आहे.
ग्रहण काल माहिती
स्पर्श सकाळी:- १०:०७ मी ग्रहण आरंभ
मध्य सकाळी १२:०१ मी
मोक्ष सकाळी १:३४ मी ग्रहण समाप्त
पर्व काल ३ तास २७ मि.
वेधारंभ शनिवारी रात्री ९.३०सुरु
ग्रहाणाचा वेध — रविवारी दिवसाच्या द्वितीय प्रहारामध्ये सूर्यग्रहण असल्याने शनिवारी रात्री साडे नऊ नंतर वेधाचा आरंभ होतो. त्यामुळे रात्री साडे नऊ नंतर आहार घेऊ नये.
बाल,वृध्द, आजारी,अशा व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियां सकाळी ७.३० पर्यंत आहार स्विकारु शकतात. त्यानंतर ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान,जप,नित्यकर्म, देवपूजा,श्राद्ध कर्म ही करता येतात. वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप, इ. कर्मे करता येतात. ग्रहणपर्वकाळात म्हणजेच सकाळी १० ते १|३० या कालावधीत पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप इत्यादी कर्मे करणे करू नये.
भारतामध्ये हे ग्रहण खंडग्रास दिसेल.
*पुण्यकाल / पर्वकाल* ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल मानावा.
खगोलीय घटनांमध्ये दुर्मीळ समजले जाणारे चूडामणि नामक सूर्यग्रहण आहे. म्हणजेच कंकणाकृती.
भारतातून हे सूर्यग्रहण दिसेल, सूर्यग्रहणात चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकते.
परंतु जर त्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा आपल्याला दिसते, त्यालाच ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. अक्षरश: ‘फायर रिंग’चे दर्शन आपल्याला होते. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी न पाहता चष्म्याचा वापर करावा, असे ते म्हणाले.
२१ जून २०२० रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि उत्तराखंडमधील काही प्रदेशातून दिसणार आहे.
वेधातील नियम काय आहे?
भोजन करू नये, ग्रहण स्पर्श ते मोक्ष काळात मल- मूत्र विसर्जन,
भोजन, अभ्यंगस्नान,झोप, काम
विषयक सेवन शक्यतो टाळावे.
नदीत स्नान शुभ मानले जाते. यथाशक्ती स्नान कुठच्याही नदीत गंगा समजून करावी.
ग्रहण स्पर्श, ग्रहण मध्य आणि मोक्षानंतर स्नान करावे.
ग्रहण मोक्षा नंतरच स्नान पूजा श्राद्ध भोजनादी करावे. यादिवशी यतिंना हस्तोदक नाही.
ग्रहण मोक्षा नंतरच मृत्तिकाऋषभ पूजा करावी. निर्माल्य विसर्जन ग्रहण स्पर्शापूर्वी करावे.
ग्रहण कालावधीत काय करावे?
स्नान,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र पुर्शचरण करावे. ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच दर्भ व तुलसीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत.
ग्रहणाबाबतीत बऱ्याच गैरसमजुती आहेत. ग्रहण लागताच वेध लागते. त्यामुळे काहीच करु नये. हे खरेही आहे म्हणून काय करावे काय करु नये हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
१) ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.
२)ग्रहण काळात झोपू नये
३)घराची साफ सफाई करू नये.
४) गर्भवती स्त्रियांनी देवाची उपासना करावी. जप करावा. घरातून बाहेर जाऊ नये व ग्रहण काळी काहीही खाऊ नये. नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.
५) ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे.
६)ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका. शांत रहा,ध्यान करा, नाहीतर गप्प बसा.
७) ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.
८) ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये,घरात दरिद्रता येते. सावध रहा.
९) ग्रहणकाळात जो शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.
१०) ग्रहणकाळात संभोग करु नये. नाहीतर डुक्कराच्या योनीत जन्म येतो.
११) ग्रहणकाळात चोरी, फसवणे,करु नका नाहीतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागेल.
१२) ग्रहणकाळात जीवजंतू व कोणाची हत्या करु नका.नाहीतर अनेक योनींत भटकावे लागेल.
१३) ग्रहणकाळात भोजन,माॅलीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.
१४) ग्रहणकाळात मौन पाळा,जप करा,ध्यान करा.याचे फल लाख पटीने आहे.
१५) ग्रहणकाळात सर्व कामे सोडून मौन व जप करा हे फार महत्त्वाचे आहे.
१६)सत्य ग्रहणशक्ती अगोदर खावून-पिऊन घ्यावे पण बाथरूम ला जावे लागेल असे घेऊ नये.
१७) नशापाणी,घाणेरडे वागणे करु नये.स्वैयपाक करु नये. धुणे धुवू नये. पाणी भरु नये,
१८) गर्भवतीने ग्रहणकाळात भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे. मुले बुद्धिमान होतात.
ग्रहणकाळात काय करावे काय करु नये ही माहिती मी दिली आहे.ही लक्षात ठेवा.हे सर्व शास्त्र परिहार आहे.यातून कोणतीही सूट नाही.
-ज्योतिषी निशांत मोदगेकर बेळगाव