Tuesday, January 21, 2025

/

रविवारी वाढले कोरोना पोजिटिव्ह 8 रुग्ण

 belgaum

रविवारी कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून एकूण 318 असलेला आकडा पुढे सरकला आहे.रविवारी सायंकाळी राज्य मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यात 8 कोरोना पोजिटिव्ह रुग्ण वाढले आहेत त्यामुळे ही संख्या 326 वर पोहोचली आहे.

बेळगाव परिसरात रविवारी पुन्हा कोरोनाने एंट्री मारली काकती मध्ये सदाशिवनगर मध्ये एक चिकोडी तालुक्यातील बोरगाव 2 आणि हुक्केरी तालुक्यात 4 असे 8 रुग्ण सापडले आहेत.

रविवारी सापडलेले सर्व रुग्ण क्वारंटाइन होते.बेळगाव शहरात आणखी एक रुग्ण वाढण्याची शक्यता असून त्याची बंगळुरू अशी ट्रॅव्हल हिस्ट्री आहे त्यामुळे आंतर जिल्हा देखील रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे.

बेळगाव मधील एकूण रुग्णांपैकी 4 रुग्ण बरे झाले असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 303 झाली असून 24 रुग्ण आयसोलेशन मध्ये आहेत तर 2824 जणांचे नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.