वडगाव येथील एका तरुणीने विहिरीतील घडघड्याच्या सळीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
श्रद्धा दिवटे वय 20 रा वडगाव असे त्या तरुणीचे नाव आहे. मागील वर्षी बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने तिने स्वतःचे जीवन संपविल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. परसात असलेल्या विहिरीतील घडघड्याला साडीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
रविवारी रात्री बारा ते सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्यामध्ये तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची नोंद शहापूर पोलीस स्थानकात आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. तरुणीचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल मधील शवागारात हलविण्यात आला आहे. उत्तरीय तपासणी करून तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.