कर्जबाजारीपणातून वैभवनगर येथील एका तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. रमेश यल्लाप्पा गौडर वय 28 राहणार वैभव नगर दुसरा क्रॉस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेशची पत्नी लक्ष्मी यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन या तरुणाने आपले जीवन संपवले आहे.
रमेश हा व्यवसायाने वाहन चालक होता. लॉकडाऊन काळात त्याने काही कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने मानसिक तणावाखाली त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. कर्जबाजारीपणा व व्यसनाधीनता यामुळे रमेशने आपले जीवन संपविल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. सिव्हील हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.