नाथ पै चौक, शहापूर येथील एका जलवाहिनीला गेल्या वर्षभरापासून गळती लागली असून याकडे कोणाचेच लक्ष नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नाथ पै चौक, शहापूर येथील एका जलवाहिनीला गळती लागली असून गेल्या वर्षभरापासून या प्रकाराकडे अद्याप कोणाचे लक्ष केलेले नाही. या जलवाहिनीला लागलेल्या गळतीची वेळीच दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे आतापर्यंत शेकडो लिटर पाणी वाया गेले आहे.
परिणामी वर्षभरापासून गळतीचे पाणी गटारीतून वहात आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील या प्रभागातल्या माजी नगरसेवकांसह महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी अथवा पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही.
तेंव्हा आतातरी ही पाणी गळती त्वरित थांबवावी, अशी मागणी नाथ पै चौक परिसरातील व्यापाऱ्यांनी कली आहे.