मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी काही कार्यालये एक महिन्याच्या आत बेळगावच्या सुवर्ण सौधमध्ये स्थलांतर करा असा आदेश बजावला होता.त्याची कार्यवाही करण्यात आली असून माहिती आयोगाचे कार्यालय सुवर्ण सौधमध्ये सुरू करण्यात आले आहे.
हलगा येथील सुवर्ण सौधच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 141 मध्ये हे माहिती आयोगाचे कार्यालय सुरू झाले आहे.उत्तर कर्नाटकातील जनतेने आणि संघटनांची बऱ्याच दिवसापासून सुवर्ण सौधमध्ये काही कार्यालये हलवावीत अशी मागणी होती.
अन्य काही कार्यालये देखील लवकरच सुवर्ण सौधमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. बी व्ही गीता या अधिकारी बेळगाव बेंचच्या माहिती आयुक्त असणार आहेत.गेल्या तीन चार वर्षांपासून ओसाड असणाऱ्या सुवर्ण सौध मध्ये राज्य स्तरीय कार्यालये सुरू करा अशी मागणी होती त्याची सुरुवात झाली आहे.