हांदिगनूर येथे मागील तीन वर्षापासून सुमारे 21 एकर मध्ये उद्योग कात्रीतून तलावाचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. यामध्ये ज्योतिबा नामक व्यक्तीने यासाठी परिश्रम घेतले आहेत.
या तलावाच्या मंजुरीसाठी जे श्रेय जाते ते ज्योतिबा यांना जाते. तलाव कशा पद्धतीने होणार याकडे सार्यांचे नजरा लागून राहिल्या असल्या तरी पंचायत राज्य मुख्य सचिव एल के अतिक यांनी याला नुकतीच भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. पंचायतराज मुख्य सचिव अतिक यांनी कामाची प्रशंसा केली आहे. सध्या हांदिगनूर ग्रामपंचायत सुरू असलेल्या तलावात या कामाला गती आली आहे.
![Cs visited handignur](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/06/IMG-20200610-WA0203.jpg)
उद्योग खात्री योजनेअंतर्गत या तलावाची निर्मिती करण्यात येणार असून अनेक रोजगारांना काम मिळणार आहे. हांदिगनूर गावाबरोबरच इतर गावातील रोजगार यांनाही त्या ठिकाणी काम देऊन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष करून तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत ठोस पावले उचलली आहेत आणि हे तलाव करून इतर शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
या तलावाच्या निर्मितीनंतर सुमारे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या तलावाची निर्मिती योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नुकतीच राज्याचे मुख्य सचिव अतिक भेट देऊन याबाबत प्रशंसा केली आहे व तेथील कामगारांची संवाद साधला आहे. त्यामुळे कामगारही याबाबत आता प्रामाणिकपणे काम करून शेतकऱ्यांना याचा लाभ करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.