स्मार्ट सिटी योजना ही केंद्र सरकारने आणि पंतप्रधान मोदीजी यांनी शहरांचा विकास करण्यासाठी निश्चित केली. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव टोपन्नावर यांनी केली आहे.
पावसाळ्याआधी रस्ते होते ते डागडुजी करून त्यावरून प्रवास सुरू करण्यात आले आहेत. सुमारे 700 कोटींचा भ्रष्टाचार या योजनेत झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने एक हजार कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामधील केवळ 300 कोटी खर्च करून इतर सातशे कोटी भ्रष्टाचार करण्यात आला आहेत. यामध्ये विविध कंपन्या व कंत्राटदार तसेच त्यांच्या हाताखाली कंत्राटदारांनी मिलीभगत करून सरकारला टोपी घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे सीबीआय चौकशी करण्याची मागणी राजू टोपानांवर यांनी केली आहे.
शहरातील मुख्य नाला म्हणून बल्लारी नाल्याकडे पाहिले जाते. मात्र संपूर्णतः साफ करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. असे असताना देखील शहरात स्वच्छता मोहीम राबवण्याचे दाखवून केवळ पैसे लुटण्याचे काम करण्यात आले आहे. विकसित बेळगावला भकासीकरण करण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. मोठमोठ्या कंपन्यां यामध्ये समावेश करण्यात आल्या असल्या तरी योग्य दिशेने काम चालू नसल्याने आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने येथील जनता मेटाकुटीला आली आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यामधून रस्ते करण्याचा घाट घालण्यात आला आहे. तो कुचकामी आहे. अनेक शेतकऱ्यांना वाऱ्यावर आणण्याचे काम स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. सुमारे 700 कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. सुमारे 700 कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यामध्ये अधिकारी, कंत्राटदार आणि कंपनी मालक यांचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बी एस येसीयूराप्पा याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण सीबीआयकडे देऊन याची चौकशी व्हावी अशी मागणी राजू टोपन्नावर यांनी केली आहे.
Nice, keep going on such news to be come….