एपीएमसी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे.एपीएमसी मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नाही.त्यामुळे सगळे सदस्य एकत्र आले असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार आमदार सतीश जारकीहोळी यांच्याकडे दिले आहेत.
कोरोनामुळे यावर्षीची एपीएमसी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिन विरोध होण्याची दाट शक्यता आहे.अध्यक्ष,उपाध्यक्ष उमेदवार निवडीबाबत आमदार सतीश जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात चर्चा झाली आहे.सतीश जारकीहोळी हे सोमवारी सकाळी नावे जाहीर करणार आहेत.
सतीश जारकीहोळी यांनी भाजपचे माजी आमदार संजय पाटील व काही समितीच्या नेत्यांशी देखील अध्यक्ष कुणाला करावे याबाबत चर्चा केली असल्याची देखीलं माहिती उपलब्ध झाली आहे.अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याविषयी सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.माजी बुडा अध्यक्ष युवराज कदम यांचेही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.दोन्ही पदे काँग्रेसला मिळावीत अशीही काहींची इच्छा आहे.
मागील दोन टर्म मध्ये सतीश जारकीहोळी यांनी निंगाप्पा उर्फ आप्पा जाधव व आनंद पाटील या दोन्ही मराठा समाजातील सदस्यांना अध्यक्षपद दिले होते सतीश यांचे मराठा प्रेम सर्वश्रुत आहे त्यातच तालुक्यातील मराठा संख्या पहाता यावेळी देखील ते मराठी समाजातील उमेदवारांला पसंदी देतील अशी शक्यता आहे त्यातल्या त्यात एकीकरण समितीचा सदस्य देखील अध्यक्ष पदी विराजमान होण्याची शक्यता देखील अधिक आहे या सगळया मुळे दोन्ही पदे मराठी भाषिकांना दिली जातील अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवारी सकाळी सतीश जारकीहोळी नावे जाहीर करेपर्यंत अनेक अंदाज वर्तवले जाणार आहेत.सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.