रुक्मिणी नगर परिसरा सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी माळ मारुती पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आता जुगार खेळणाऱ्या तसेच मटका घेणाऱ्या वर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. माळमारुती परिसरात जुगार खेळणाऱ्या कडून 3830 रुपये जप्त करण्यात आले आहेत. तबरेज खताल खसापूरी राहणार खंजर गल्ली, सैबाजखान रहेमानखान पठाण, अब्दुलसमद गवंडी, इम्रान हुसेन गोरेखान, रोमन इजाज जमादार सर्व राहणार वीरभद्रनगर, असद रफिक मुल्ला राहणार जालगार गल्ली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सार्वजनिक ठिकाणी हे सारेजण जुगार खेळत असल्याचे पोलिसांना समजले. अचानक धाड टाकून या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे रुक्मिणी नगर येथे अंदर बहार जुगार खेळण्याची माहिती मिळताच अचानक धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मारुतीचे पोलीस निरीक्षक बी आर गडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
Less than 1 min.
Previous article
Next article