प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गाणी म्हणणे किंवा ऑनलाइन परीक्षण करणे यात खुप फरक असतो प्रत्यक्ष बघितलं तर हावभाव चांगले कळतात हे शब्द जेष्ठ गायक अतुल दाते यांचे..
अतुल दाते यांच्या समोर गायन करणे हा बेळगावच्या लिटल चॅम्प साठी आगळा वेगळा अनुभव होता निमित्त होते सर्वेशानंद संगीत विद्यालय आयोजित ऑनलाइन व्हीडिओ गीत गायन अंतिम फेरीचे..रविवारी zoom app च्या माध्यमातून ऑनलाइन व्हीडिओ गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी पार पाडली त्यावेळी अनेक चिमुकल्यानी गाणी म्हणून दाखवली.
गीत गायनाचे कार्यक्रम बेळगावातील गायकांना घेऊन करू असे आश्वासन अतुल दाते यांनी बाल गायकांना दिले आहेत.दाते यांनी कोणत्या मुलानं कोणतं गाणं म्हटलं यावर बारकाईने लक्ष देत या स्पर्धेचा निकाल जाहीर केला.दररोज रियाज करा रियाज चुकवू नका गाणं म्हणता म्हणता एक वाद्य वाजवायला शिका असा सल्ला अतुल दाते यांनी स्पर्धकांना दिला.
मोठ्या गटात बेळगावच्या तन्वी इनामदार प्रथम,चैत्रा अध्यापक दुसरा क्रमांक तर गडहिंग्लजच्या संस्कृती कांबळे हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. लहान गटात प्रथम क्रमांक वीणा कंग्राळकर,दुसरा क्रमांक स्वामींनी शहापूरकर तर तिसरा क्रमांक केया श्रेयकर यांनी पटकावला ..लहान गातात तिन्ही बेळगावच्या मुलींनी पुरस्कार मिळवले.
लहान आणि मोठ्या गटात मिळून 63 कलाकारांनी या ऑनलाइन व्हीडिओ गीत गायन स्पर्धेत सहभाग घेतला होता.लहान गटातुन 15 तर मोठ्या गटातून 18 दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली होती.या स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे परीक्षण स्वतः चंद्रज्योती देसाई यानी केले.. दुसऱ्या फेरीचे परीक्षण संगीतरत्न शंकर पाटील व किशोर काकडे यांनी केलं.आणि अंतिम फेरीचे परीक्षण अतुल दाते यांनी केलं ..
या स्पर्धेत पुणे, मुंबई , गडहिंग्लज नाशिक, बेळगांव आणि गोव्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
केवळ स्पर्धा आयोजन करून न थांबता या विजेत्या स्पर्धकांना गायनाची संधी उपलब्ध करून द्यावी आणि गाण्याचे कार्यक्रम करावे अशी माझी संकल्पना चंद्रज्योती देसाई नी सांगितली अतुल दाते यांच्या मार्गदर्शन घेत पुढे कांही कार्यक्रम आणि अशा स्पर्धा जरूर करणार आहोत असे आयोजिका चंद्रज्योती देसाई यांनी सांगितले.