सरकारच्या नागरी पुरवठा खात्याकडून रेशन कार्ड अथवा आयुष्यमान भारत हेल्थ कार्डमधील दुरुस्ती व सुधारणेसाठीची सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या रेशन कार्डमध्ये नांव, पत्ता वगैरे बाबींमध्ये कांही चुका झाल्या असतील अथवा त्यामध्ये सुधारणा करायची असतील म्हणजे नांवे वाढविणे, वगळणे, पत्त्यामध्ये बदल आदी काम सुरू करण्यात आले आहे.
आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड सर्व्हर सुरू झाला आहे. तेंव्हा ज्यांना आपल्या रेशन कार्ड अथवा आयुष्यमान भारत हेल्थ कार्डमध्ये सुधारणा करून हवी असल्यास त्यांनी नजीकच्या सीएससी / व्हीएलई किंवा नागरी पुरवठा खात्याच्या अधिकृत फ्रॅंचाईजीला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.