पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बोलल्याप्रमाणे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.पश्चिम भागातील महत्वाचं ठिकाण समजलं जाणाऱ्या बेळगुंदी जिल्हा पंचायत कार्यक्षेत्राला सर्वात अगोदर त्यांनी प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.
बेळगुंदी गावात पोलिस आऊट पोस्ट करून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत या शिवाय बेळगाव शहराची तहान भागावणाऱ्या राकसकोप्प जलाशय परिसरातील गावाना बेळगुंदी गावाजवळील गावांची पाणी समस्या मिटवण्यासाठी धरण बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.

बेळगुंदी जिल्हा पंचायतीचे सदस्य मोहन मोरे यांनी नुकताच राज्याचे जलसंपदा मंत्री पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन या समस्या सोडवा अशी मागणी केली असता जारकीहोळी यांनी बेळगुंदी भागांत पोलीस चौकी स्थापन करू व पाणी समस्या सोडवण्यासाठी धरण बांधून देऊ असे आश्वासन दिले आहे.
पश्चिम भागातील म्हणजे विशेषतः बेळगुंदी राकस्कोप भागातील भागातील लोकांना पोलीस स्थानक गाठायचे असल्यास कोणतीही तक्रार किंवा समस्या मांडायची असल्यास बेळगुंदी हुन वडगांव ग्रामीण पोलीस स्थानकाला यावे लागते शहर ओलांडून 20 की मी.प्रवास करावा लागतो यासाठी या भागांत पोलीस आऊट पोस्ट करण्याची मागणी कित्येक दिवसांची होती.
जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांनी रमेश जारकीहोळी यांच्याकडे केली त्यावर पालकमंत्र्यांनी केवळ पोलीस चौकीचं नव्हे तर या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी 200 एकर शासकीय जागेत धरण बांधून देतो असे आश्वासन दिले आहे.या भागातील दोन्ही समस्या सुटल्यास या भागातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे.