बेळगावचे पालकमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यावर पहिल्यांदाचं ग्रामीण मतदारसंघा बाबत भाष्य करताना रमेश जारकीहोळी यांनीं निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळीच ग्रामीण मतदार संघावर विशेष लक्ष देऊ असं म्हटलं आहे.
सोमवारी झालेल्या जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या बेळगाव तालुका विशेष आढावा बैठकीत काँग्रेसच्या आमदार आणि रेल्वे राज्य मंत्री यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती बैठकीत काँग्रेस आमदारानी केंद्रीय भाजपच्या योजनांवर टीका केली होती त्यावर भाजपचे नेते आमदारात कलगीतुरा रंगत असताना रेल्वे राज्य मंत्र्यांनी हस्तक्षेप केला होता. यावेळी अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते.
बैठकीत महिला आमदारांनी भाजप सरकारवर बोचरी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना रमेश जारकीहोळी यांनी म्हणाले की घाणीत दगड मारल्यास काय होते? आमदार महोदयांना अनुभवाची कमतरता असावी. केवळ पत्र देऊन बैठका घेऊन शो ऑफ करणारं आमचं सरकार नव्हे. चांगल्या उद्देशयाने स्थिर सरकार दिलेलं आहे.
लोक प्रतिनिधीनी सरकारच्या बाजूनी असावे मात्र सरकारला आव्हान देणारे बुद्धी नसणारे असतात त्यांच्या पक्षा बद्दल आम्ही बोलणार नाही बेळगाव तालुक्याच्या विकासासाठी बैठक आयोजित केली आहे इथं राजकारण करणार नाही मात्र आगामी काळात निवडणूक जवळ आल्यास ग्रामीण मतदारसंघा बाबत विशेष काळजी घेऊ असे ते म्हणाले.
डी सी सी बँक बाबत उमेश कत्ती आणि भालचंद्र जारकीहोळी निर्णय घेतील त्या दोघांनी घेतलेला निर्णय हाय कमांडला देखील मान्य असेल असे ते म्हणाले. बिम्स कोरोना वार्ड मधील गैरसोय केलेल्यांची गय केली जाणार नाही याबाबत जिल्हाधिकारी डॉ बोमनहळळी यांच्याशी चर्चा केली आहे अनेक तालुका आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी फोन वर तक्रारी केल्याने बैठक घेतली आहे असे देखील त्यांनी नमूद केलं.