आमदार उमेश कत्ती यांच्या घरी भाजपचे आमदार भोजनाला गेले होते.लॉक डाऊन कालावधीत हॉटेल बंद असल्यामुळे ते कत्ती यांच्याकडे जेवायला गेले होते.भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही असा खुलासा नूतन पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला.
मी तिसऱ्या वेळी पालकमंत्री झालो आहे.या अगोदर जगदीश शेट्टर पालकमंत्री होते पण मीच पालकमंत्री असल्यासारखा होतो.आता पुन्हा मीच पालकमंत्री झालो आहे त्यामुळे बदल काही झाला नाही.राज्यसभा निवडणुकीबाबत आमची मते हाय कमांडला कळवली आहेत.त्याबद्दल जाहीरपणे बोलता येत नाही.हाय कमांड घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे असेही रमेश जारकीहोळी म्हणाले.
मागच्यावेळी पूरस्थिती हाताळताना केलेल्या चुका करू नयेत.पूरस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कोणीही चांगल्या योजना,सल्ले दिल्यास त्याचा मी स्वीकार करण्यास तयार आहे.पक्षभेद न करता सगळ्यांना बरोबर घेऊन कार्य करणार असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले.
8 जून नंतर सौन्दत्ती यल्लम्मा असो मायक्का चिंचली देवस्थान असो कधी सुरू करायचे याबाबत जिल्हा प्रशासनाला फ्री हॅन्ड देण्यात आला आहे आम्ही यावर दबाव आणणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.