यशवंतपुर हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस व्हाया बेळगाव लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत रेल्वे बोर्डाने दिले आहेत. रेल्वे बोर्ड नजीकच्या काळात अनेक नव्या रेल्वे सुरू करणार आहे.नैऋत्य रेल्वे आठवडयात दोन वेळा यशवंतपुर ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सुरू करणार आहे.
यशवंतपूरहून मंगळवार आणि गुरुवारी ही रेल्वे निघेल तर हजरत निजामुद्दीन येथून गुरुवारी आणि शनिवारी निघणार आहे.त्याचा फायदा बेळगावच्या प्रवाशांना होणार आहे.रेल्वे बोर्डाने दोनशे किलोमीटर हून अधिक अंतर धावणाऱ्या रेल्वे एक्स्प्रेस रेल्वेत रूपांतर करायचे ठरवले आहे.
आर्थिकदृष्ट्या उपयुक्त नसलेले थांबे देखील रेल्वे बोर्ड रद्द करण्याच्या विचारात आहे.रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी देखील रेल्वे बोर्ड सगळ्या प्रस्तावांचा विचार करत आहे.
Frequency:
Ex Yesvantpur – Tuesday and Thursday
Ex H Nizamuddin – Thursday and Saturday