Thursday, December 26, 2024

/

तालुक्यात क्वॉरनटाइन नागरिकांची संख्या वाढली

 belgaum

बेळगाव  तालुक्यात परराज्यातून तसेच अंतर्गत जिल्ह्यातील  क्वांरंटाइन नागरिकांची संख्या वाढत आहे. हा आकडा हजारच्या पास गेला आहे. त्यामुळे आरोग्य खाते याकडे गांभीर्याने पाहत आहे. बेळगाव तालुक्यातील ही संख्या वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

परराज्यातून तसेच परत जिल्ह्यातून तालुक्यात येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आता आरोग्य खाते अशा कार्यकर्त्यां अंगणवाडी कार्यकर्त्यां जोमाने कामाला लागले आहेत. या परिस्थितीत तालुक्यात एकूण हजारांच्या जवळपास असून या सर्वांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी ही माहिती दिली आहे.

तालुक्यात मागील काही दिवसापासून अनेक जण बाहेरून येणाऱ्या नागरिकांना विरोध करत आहेत. मात्र तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी अनेकांची समजूत काढून बाहेरून येणाऱ्यांना क्वॉरांटाइन म्हणून ठेवण्यासाठी शाळा समुदाय भवन तसेच इतर संस्थांमध्ये व्यवस्था केली आहे. दरम्यान तालुक्यातील नागरिकांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत देखील अजूनही ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या 500 हुन जण पुरुष क्वॉरनटाइनमध्ये ठेवण्यात आले आहेत तर 200 हुन अधिक महिला क्वॉरांटाइन म्हणून ठेवण्यात आले आहे. त्यांची सर्वती व्यवस्था ग्रामपंचायत करत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच त्यांच्या जेवण खाणे शौचालय यासह संबंधित ठिकाणी विद्युत बल्प बसवण्याची सोयही करण्यात येत आहे. रविवारी तालुका पंचायतीने जाहीर केलेल्या मार्ग सूचीनुसार हा आकडा वाढत असून अनेकांना क्वॉरनटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर अंतर्गत जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना होम क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. अजूनही ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य खाते तसेच ग्रामपंचायतीने दक्षता घेऊन अनेकांना मदत करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना कोणी भेटू नये याचीही दक्षता घेण्यात आली आहे. याकडे प्रशासनही गांभीर्याने लक्ष देऊन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.