बारावीचा इंग्लिश पेपर पार पडला ज्या पद्धतीने शिक्षण खात्याने कोरोना बाबत परीक्षा केंद्रावर काळजी घेण्याचा प्रयत्न केला त्यात केवळ सकाळच्या सत्रात काही अंशी ते यशस्वी झाले.प्रशासन शिक्षण खाते परिवाहन खाते आणि पोलीस खाते यांनी कोविड 19 च्या पाश्वभूमीवर हिकमतीने इंग्लिश पेपर पार पाडला.
बारावीचा इंग्लिश पेपर म्हणजे शासन विद्यार्थी पालक आणि शिक्षण खात्याची देखील परीक्षाच होती.या पेपर नंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत यावर्षीचे शैक्षणिक वर्ष कसे चालणार?कधी पासून शाळा सुरू होणार?पालकांच्या मनातील भीती कोण काढणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इंग्लिश पेपर आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतलेले शिक्षण खाते आरोग्य खाते परिवाहन खाते यांचे कौतुक करायला हवे नेहमी टीका करण्या पेक्षा शासनाने केलेल्या कौतुक नक्की करायला पाहिजे.
पुढील आठवड्यात होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची आजचा इंग्लिश पेपर म्हणजे जणू काही रंगीत तालीमच होती.बारावीची मुले दहावीच्या मुलांच्या पेक्षा जाणकार आहेत काही अंशी कोरोनाच्या बाबतीत ते काळजी घेऊ शकतात अशी परिस्थिती होती पण दहावीच्या विध्यार्थ्यां बाबत हे शक्य होईल का? हे प्रश्नचिन्ह आहे.
बारावीचा इंग्लिश पेपर सुरू होण्याआधीचे गांभीर्य पेपर सुटे पर्यँत हरवलं होत.पेपर सुटताच पालक आणि विद्यार्थ्यांनी घोळका करून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला.
बेळगावातील कोरोना गेला आहे असे अजिबात नाही रुग्णांची संख्या वाढतेच आहे धोका कायम आहे या पाश्वभूमीवर जर बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात हजारो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत या पाश्वभूमीवर जर का कुठे गफलत झाली तर तर कोरोना गुणांकारांनी वाढणार कंम्युनिटी स्प्रेड होणार हे सगळं लक्षात घेता पालक आणि विद्यार्थ्यावर चाप लावत अधिक गांभीर्याने परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजेत.
समाजात सुसंस्कृतता टिकून रहायची असेल तर शैक्षणिक व्यवस्था योग्य पद्धतीने वाटचाल करायला हवी केवळ पालक किंवा विध्यार्थ्यांनी प्रयत्न न करता शासन समाजांनी देखील यासाठी पुढाकार घ्यायला हवा.