आत्महत्या केलेल्या विणकराना शासनाने नुकसान भरपाई दिली नाही तर 18 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा विणकर संघटनानी दिला आहे.
सोमवारी बेळगाव जिल्हा विणकर वेदिकेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
संबंधित अधिकाऱ्यांनी व लोक प्रतिनिधींनी
मृत विणकरांची कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना १० लाख रुपये भरपाई मंजूर करावी तसेच विणकरांची समस्या सोडवण्यासंदर्भात विणकर नेत्यांशी सरकारने चर्चा करुन तोडगा काढावा अन्यथा येत्या १८ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी विणकरांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करुन न्याय देण्याची मागणी केली. आर्थिक संकटामुळे बेळगाव जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या तीन विणकरांची कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दहा लाख रुपयांची भरपाई मंजूर करावी , तसेच विणकरांच्या मागण्यांकडे सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून दुर्लक्ष केले आहे .
सरकारने विणकरांची ३०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करावे , त्याचप्रमाणे विणकरांनी तयार केलेल्या साड्या सरकारने खरेदी कराव्यात , त्याचप्रमाणे विणकरांना सरकारने जाहीर केलेली २००० हजार रुपयांची आर्थिक मदत वाढवून ५ हजार रुपये इतकी द्यावी , त्याचप्रमाणे १८ जून पर्यंत राज्य सरकारने विणकर नेत्यांशी मागण्यांसंदर्भात चर्चा न केल्यास , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा राज्यसरकारला देण्यात आला आहे .
यावेळी निळकंठ मास्तमर्डी , परशराम ढगे , रमेश सोनटक्की , नारायण खामकर , श्रीनिवास तालुकर , तसेच विणकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.