लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या पोलिसाला अटक करण्यात आली आहे.पोलीस म्हणून सेवा बजावणाऱ्या इम्रान खान घोरी,(28)मावनूर, हुक्केरी असे अटक केलेल्या पोलीसाचे नाव आहे.
महिला पोलीस स्थानकाच्या सिपीआय श्रीदेवी पाटील यांनी या पोलिसाला अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावली.पीडित तरुणीची तक्रार नोंदवून घेण्यास यमकनमर्डी पोलीस टाळाटाळ करत होते.एस पी लक्ष्मण निंबरगी यांना पोलिसाचे कृत्य समजल्यावर त्यांनी मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना तक्रार नोंदवण्यास सांगितले आणि कोणी धमकी दिल्यास थेट येऊन भेटायला सांगितले.
इम्रानखान घोरी हा बसने रोज बेळगावला येत होता.बसमधून येताना त्याची तरुणीशी ओळख झाली.त्यातून त्याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले.लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले.नंतर तरुणीला इम्रान विवाहित असून दोन मुलांचा बाप असल्याचे कळले.त्यामुळे तिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला पण सुदैवाने ती वाचली.
महिला पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यावर इम्रान गाव सोडून लपून बसला होता.पण सिपीआय श्रीदेवी पाटील यांनी त्याला जाळे विणून अटक केली.सदर पोलीस कॉन्स्टेबल सिटी रिजर्व पोलीस दलात सेवा बजावत आहे.